surmai fry in marathi

कुरकुरीत स्पेशल सुरमई फ्राय रेसिपी – (2021)

Spread the love

नमस्कार मित्रानो, आज जी आपण रेसिपी बनवणार आहोत ती महाराष्ट्रामधली सगळ्यात जास्त खाल्ली जाणारी आणि पसंद केली जाणारी रेसिपी आहे. जिचं नाव आहे सुरमई फ्राय (Surmai Fry). ह्या रेसिपीचा नाव ऐकताच तोंडात पाणी येतो. आणि जर जेवणाला हि रेसिपी असली कि जेवण सुद्धा जास्त जातो. पण तुम्ही विचार करत असणार कि ह्या रेसिपी ला बनवणं खूप कठीण असेल पण असं काहीच नाही. ह्या रेसिपी ला बनवण्यासाठी किंचित सामानाची गरज लागते तुम्ही घर बसल्या कधीही ह्या रेसिपी ला बनवू शकता.

ह्या रेसिपी ला जर तुम्ही एकदा खाल तर दुसऱ्या वेळी नक्कीच घेणार अशी जादू आहे ह्या रेसिपी मध्ये. आणि हि रेसिपी छोट्या मुलांपासून मोठ्या वयस्कारापर्यंत सगळ्यांना हि रेसिपी खूप आवडते. त्यासाठीच आम्ही आज तुमच्या साठी फोटो सह detail मध्ये रेसिपी कशी बनवायची ह्या बद्दल सांगणार आहोत तर आशा करतो ते तुम्हाला आवडतील. चला तर मग सुरु करूया आपल्या आजच्या विषयाला…

सुरमई फ्राय बनवण्यासाठी लागणारी सामग्री

सामग्रीमात्रा
सुरमई३७५ ग्राम
अद्रक लसूण ची पेस्ट१ टेबलस्पून
हळदी पावडर१/२ टेबलस्पून
लिंबाचा रस
मीठ चवी नुसार
लाल तिखट१ टेबलस्पून
धणे पावडर१ टेबलस्पून
जिरे पूड१/२ टेबलस्पून
गरम मसाला१ टेबलस्पून
कोथिंबीर बारीक चिरलेली
रवा १ कप
तांदळाचे पीठ१ टेबलस्पून
तेल

सुरमई फ्राय बनवण्याची विधी

surmai fish fry recipe in marathi

सुरमई फ्राय बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं फिश मॅरीनेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी सुरमई ला एका बाऊल मध्ये घ्यायचं आहे.

surmai tawa fry

त्यावरती १ टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालायची, १/२ टेबलस्पून हळदी पावडर, आणि चवी नुसार मीठ, आणि लिंबाचा रस टाकायचा आहे.

surmai fry recipe

हे सर्व साहित्य व्यवस्थित फिश ला चोळून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या फिश ला १५-२० मिनिटं मॅरीनेट करण्यासाठी ठेऊन द्यायचं आहे.

surmai fish fry

पुढील स्टेप मध्ये रवा फ्राय करायचा आहे. Outer Coating साठी ह्याची आवश्यकता असते. त्यासाठी पहिलं एका बाउल मध्ये १ कप रवा घ्यायचं आहे.

surmai fish

त्यानंतर त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे. आणि थोडं मीठ घालायचं आहे. आणि ह्या मध्ये १/२ टेबलस्पून लाल तिखट घालायचं आहे. ह्या सर्व साहित्याना मिक्स करायचं आहे.

surmai fish curry recipe

सुरमई फ्राय साठी लागणार मसाला कसा बनवायचा आता ते बघुयात. त्यासाठी एका बाउल मध्ये लाल तिखट घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये १ टेबलस्पून धणे पूड, १/२ टेबलस्पून जिरे पूड, १ टेबलस्पून गरम मसाला, मीठ चवी नुसार नंतर ह्या ड्राय मसाल्याना मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ह्या मिश्रणामध्ये ३-४ टेबलस्पून थोडं पाणी टाकायचं आहे. आणि परत सगळ्या मिश्रणांना मिक्स करायचं आहे. आणि त्या मध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आहे.

fish fry recipe in marathi

पुढील स्टेप मध्ये मॅरीनेट केलेल्या प्रत्येक फिश वरती मसाल्याचं मिश्रण टाकायचं आहे.

surmai tawa fry

आणि त्यानंतर आपण जे रव्याचं मिश्रण जे केलं आहे त्यामध्ये मसाला लावलेला फिश ला घोळून घ्यायचं आहे. अश्या सगळ्या फिश ला मसाला आणि रवा लावून घोळून घ्यायचं आहे.

surmai fry recipe

त्यानंतर १ पॅन आपण गॅस ठेवायचं आहे आणि त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल ला High Heat वरती गरम करायचं आहे. आणि त्यानांतर फिश ला तेल मध्ये फ्राय करायचं आहे आणि तेव्हा गॅस ला Medium फ्लेम वरती ठेवायचं आहे. त्यानंतर ह्या फिश ला दोन्ही बाजूला ३-३ मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे.

fish fry recipe in marathi language

३-३ मिनिटानंतर आपली रुचकर सुरमई फ्राय रेसिपी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही ह्या रेसिपीला तांदळाची भाकरी किंवा चपाती सोबत हि खाऊ शकता.

पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून आभारी आहे.

तर मित्रानो आशा करतो कि (Surmai Fry Recipe In Marathi) आपल्या आवडलं असेल. तर तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणी, नातेवाईक आणि ज्यांना नवनवीन रेसिपी शिकायची इच्छा आहे त्यांना नक्की शेयर करा. आणि आम्हाला खाली कंमेंट करून नक्की सांगा कि पुढील विषय कोणत्या रेसिपीवर हवं आहे. तर आम्ही त्या विषयावर तुमच्यासाठी पोस्ट लिहू. धन्यवाद

आमच्या फेसबुक पेज ला सुद्धा जॉईन करा. Marathi Love Facebook Page

आणि अश्याच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या. Marathi Love

Summary
recipe image
Recipe Name
surmai fry
Author Name
Published On
Average Rating
51star1star1star1star1star Based on 1 Review(s)

Spread the love

Related Posts

One thought on “कुरकुरीत स्पेशल सुरमई फ्राय रेसिपी – (2021)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *